लातूर – मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम संसद भवन सिकंदरपूर येथे मंगळवार दिनांक 04/ 11/ 2025 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी [ महिला व बालकल्याण ] जावेद शेख
यांच्या मार्गदर्शनानुसार स्मार्ट व्हिलेज सिकंदरपुर येथे लेक लाडकी योजनेचा शुभारंभ लातूर पंचायत समितीचे सी.डी.पी.ओ वंगारी महिला व बाल्कल्याण विभागाचे विस्तार अधिकारी प्रदीप बोंबले, स्मार्ट व्हिलेज सिकंदरपूरच्या उपक्रमशील सरपंच प्रा. रेशमा माधवराव गंभीरे यांच्या हस्ते पात्र लाभार्थीना योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या चेकचे वाटप करून जिलेबी भरवून लाडक्या लेकीचे व त्यांच्या परिवाराचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी योजना असून 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींसाठी सुरु करण्यात आली असून दोन अपत्य असलेल्या कुटुंबाना एक मुलगी साठी किंवा दोन मुलीसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे यात मुलीच्या जन्मापासून आठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत जन्मल्या नंतर पाच हजार रुपये, इयत्ता पाहिलीत सहा हजार रुपये, सहावी मध्ये सात हजार रुपये, अकरावीत आठ हजार रुपये आणी आठरा वर्षा नंतर पंच्याहत्तर रुपये एकूण एक लाख एक हजार रुपये या योजनेत मिळणार आहेत.
या योजनेत लाभार्थ्याला दोन अप
त्य असली पाहिजेत, लाभार्थी पिवळं आणी केशरी कार्ड धारक असला पाहिजे.
या योजनेचे उदिष्ठ मुलीच्या जन्माचे स्वागत, आरोग्य, शिक्षण आणी सर्वांगीण विकास करणे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गावच्या उपक्रमशील सरपंच सौ. रेशमा माधवराव गंभीरे तर प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून लातूर पंचायत समितीचे सी.डी.पी.पो.वंगारी साहेब, विस्तार अधिकारी प्रदीप बोंबले, दुर्गे, सविता शिंदे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशदा प्रवीण प्रशिक्षक माधव गंभीरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी कलबूने के. बी. यांनी केले.
या कार्यक्रमास उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी ताई, मदतनीस ग्रामस्थ व महिला पालक बहूसंख्येने उपस्थित होते.



