सिकंदरपूर ग्रामपंचायतीचा 🏡 आदर्श विकास प्रवास (2021–आजतागायत)...!

2021 वर्षापासून ग्रामस्थांच्या मोलाच्या सहकार्याच्या बळावर सिकंदरपूर ग्रामपंचायतीने विविध विकास उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करत आदर्श गावाच्या दिशेने उल्लेखनीय वाटचाल केली आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना व जनसुविधा योजना यांच्या अभिसरणातून उभारलेले ग्राम संसद भवन हा लातूर जिल्ह्यातील पहिला पायलट प्रकल्प ठरला आहे.

ग्रामपंचायतीला मिळालेले स्मार्ट विलेज पुरस्कार, संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान अंतर्गत मिळालेले जिल्हा व विभागस्तरीय पुरस्कार ही विकासाची ठोस प्रमाणे आहेत.

ग्रामपंचायतीने राबविलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये —

  • स्तनदा मातांसाठी आरामदायी कक्ष

  • बोलकी शाळा व बोलकी अंगणवाडी

  • सौरऊर्जेवर चालणारी पेपरलेस ग्रामसभा

  • रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प

  • बायोगॅस प्रकल्प

  • वैकुंठधाम स्मशानभूमीत मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड

  • बिहार पॅटर्ननुसार वृक्ष लागवड व संगोपन

  • घंटागाडीच्या माध्यमातून ओला व सुका कचरा व्यवस्थापन

  • हँडवॉश स्टेशनची उभारणी

  • स्वच्छ RO प्लांटद्वारे पाणी व्यवस्थापन

या उपक्रमांसोबतच गावातील नागरिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत —

  • शेतकऱ्यांना मोफत जनावरांच्या दाखल्यांची सुविधा

  • रोजगार हमी योजनेतून गायींच्या गोठ्यांची निर्मिती

  • निराधार, अपंग, विधवा व महिलांसाठी मानधन योजना

  • महिला बचत गट कार्यशाळा व रोजगार निर्मिती

  • शेतकरी व पुरुष बचत गटांची निर्मिती

  • बालविवाहबंदी कायद्याची अंमलबजावणी

  • दारूबंदी उपक्रम

  • कुपोषण निर्मूलन उपक्रम

  • विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध पारदर्शक विकास योजना

याच्या कार्यकाळात २०२१ ते २०२६ मधील पुरस्कार

सौ. रेश्मा माधव गंभीरे... – सरपंच !

  • संत गाडगे बाबा स्वछता 2022-23 जिल्हा स्तरीय पुरस्कार
  • संत गाडगे बाबा स्वछता विशेष पुरस्कार 2022-23
  • महात्मा ज्योतिबा फुले ग्रामरत्न पुरस्कार
  • ज़िल्हा परिषदेचा कर वसुली पुरस्कार
  • रयत प्रतिष्ठान महाराष्ट्रचा जिल्हा स्तरीय ग्राम रत्न पुरस्कार
  • अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फॉउंडेशन कोल्हापूर चा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार आशा विविध संस्थेचे पुरस्कार सरपंच रेशमा गंभीरे व सिकंदरपूर ग्राम संसदेस प्राप्त झाले आहेत

🏅 ग्रामपंचायत सिकंदरपूरला मिळालेले पुरस्कार 🏅

सिकंदरपूर : परिवर्तनाची प्रेरणादायी (कहाणी) – यशोगाथा!

(2021–2024 आदर्श विकास प्रवास)
कोरोना काळात 100% लसीकरण, दारूबंदी, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, डिजिटल शिक्षण, घरकुल योजना आणि तब्बल ५ कोटी रूपयांच्या विकासकामांमुळे सिकंदरपूर ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर आदर्श गाव म्हणून आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे.

🌟 राज्यस्तरीय गौरव आणि विशेष उल्लेख

  • कोरोना काळात 100% लसीकरण करून, गाव कोरोनामुक्त ठेवल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमातून ग्रामपंचायतीचे व महिला सरपंचांचे कौतुक.

  • राज्यातील पहिला ₹1 कोटी 75 लाखांचा पायलट प्रकल्प, ज्यातून भटक्या जमातीच्या 44 लाभार्थ्यांसाठी “यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत” घरकुल योजना यशस्वी.

  • गावातील दारूबंदी, स्वच्छता, महिला सन्मान उपक्रम यासाठी राज्यस्तरीय महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार.

  • रयत प्रतिष्ठानतर्फे महिला सरपंचांना ग्रामरत्न पुरस्कार.

🎯 सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम

महिला सक्षमीकरण व सामाजिक परिवर्तन

  • 25 महिला बचत गटांची स्थापना, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत गावातच प्रशिक्षण.
  • महिलांना आरोग्य तपासणी, लघुउद्योग, उत्पन्न निर्मितीसाठी सातत्यपूर्ण प्रोत्साहन.

  • मकर संक्रांतीनिमित्त सर्व महिलांना डस्टबिन, झाडू व वृक्ष भेट, स्वच्छतेचा संदेश.

  • बालिकांसाठी लेक वाचवा–लेक शिकवा अभियानातून मदत.

स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन

  • गावात घंटागाडीमार्फत ओला व सुका कचरा व्यवस्थापन.

  • शमशानभूमीत 1276 मियावाकी वृक्षांचे रोपण.

  • लोकसंख्येच्या दुप्पट वृक्ष लागवड अभियान पूर्ती.

  • रस्त्यांच्या दुतर्फा बिहार पॅटर्ननुसार वृक्ष लागवड.

  • शाळा, मंदिर व अंगणवाडी येथे रेन हार्वेस्टिंग प्रकल्प.

शिक्षणातील गुणवत्ता आणि डिजिटलायझेशन

  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाचवीचा वर्ग डिजिटल: डेक्स, प्रोजेक्टर, ICT सुविधा.

  • शाळेत स्पोकन इंग्रजी आणि सेमी इंग्रजी शिक्षणासाठी तज्ञ शिक्षक नेमणूक.

  • सरपंचांच्या वाढदिवसानिमित्त 105 विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेश वितरण.

घरकुल व सामाजिक सुरक्षा

  • तीन वर्षांत विविध योजनांतून — प्रधानमंत्री, रमाई, शबरी, होळकर, अटल योजनेतून
    112 बेघरांना घरकुल मंजूर.

  • 193 निराधार, विधवा, अपंग यांना मानधन योजना मंजूर.

शेतकरी विकास व रोजगार हमी उपक्रम

  • रोजगार हमी योजनेतून

    • 30 गायींचे गोठे

    • 20 शेतकऱ्यांना सिचंन विहिरी

    • दुधाळ गट, कडबा कुट्टी मशीन, बायोगॅस प्रकल्प

  • शेतकऱ्यांच्या बांधावर 900 फळांच्या झाडांची लागवड.

  • गावात 800 नारळाची लागवड (बिहार पद्धती).

ग्रामसुविधा व अधोसंरचना विकास

  • 2021–2024 दरम्यान तब्बल 5 कोटींची विकासकामे.

  • जनसुविधा, लोकसहभाग आणि RMGY यांच्याद्वारे अत्याधुनिक ग्रामसंसद भवन निर्मिती.

  • 15 किमी रस्त्यांचे मजबुतीकरण व खडीकरण.

  • नवीन विस्तारित वस्तीत पेवर ब्लॉक, काँक्रिट, नालीकरण इ. सुविधा.

  • जलजीवन मिशनअंतर्गत ₹1 कोटी 22 लक्षांची पाणीपुरवठा योजना.

  • गावभर 131 स्ट्रीटलाईट बसविणे.

संस्कृती आणि सामाजिक सलोखा

  • लोकसहभागातून भव्य मंदिर शिखरे—

    • हनुमान मंदिर (35 फूट)

    • विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (31 फूट)

    • सती अनुसया माता मंदिर (25 फूट)

  • सैनिकांचे पाद्यपूजन, मिरवणूक व त्यांच्या कुटुंबाचा सन्मान हा ग्रामपरंपरेचा अविभाज्य भाग.

  • जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र.

प्रशासनिक विशेषता

  • 2022–23 मध्ये 100% कर वसुली, जिल्हा परिषद CEO अभिनव गोयल व गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्याकडून सन्मान.

  • ग्रामसंसदेची सर्व कामे पारदर्शक, लोकसहभागाधारित आणि विकासमुखी.

🌿 सिकंदरपूर – परिवर्तनाचे मॉडेल गाव

स्वच्छता, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, शेतकरी कल्याण आणि तंत्रज्ञानाधारित विकास या सर्व क्षेत्रांत अद्वितीय प्रगती साधून सिकंदरपूर आज राज्यातील आदर्श, प्रेरणादायी आणि प्रगत गाव म्हणून ओळखले जाते.

🏡 स्मार्ट व्हिलेज ग्रामसंसद सिकंदरपूर, लातूर चा सविस्तर इतिहास :

मौजे सिकंदरपूर हे लातूर शहराच्या दक्षिणेकडील उपनगरात वसलेले एक प्रगतिशील गाव असून लातूर शहरापासून केवळ 3 कि.मी. अंतरावर आहे. हे गाव लातूर शहर मतदारसंघात समाविष्ट असून सन 2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 1,554 असून एकूण 315 कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत.

गावामध्ये भव्य ग्रामसंसद भवन उभारण्यात आले असून या इमारतीत आपले सरकार सेवा केंद्र यशस्वीपणे कार्यरत आहे. या केंद्रामार्फत नागरिकांना विविध शासकीय ऑनलाईन सुविधा तसेच सर्व प्रकारचे दाखले वेळेवर उपलब्ध करून देण्यात येतात. 

गावातील धार्मिक वारसा अत्यंत समृद्ध असून शेषेनाथ महाराजांनी प्राणप्रतिष्ठा केलेले अनुसया मातेचे जागृत देवस्थान येथे विशेष प्रसिद्ध आहे. तसेच हनुमान मंदिर, विठ्ठल–रुक्मिणी मंदिर, श्रीकृष्ण खाटू श्याम मंदिर, एकलिंगेश्वर मंदिर व नृसिंह मंदिर अशी विविध देवस्थाने वर्षभर भाविकांनी गजबजलेली असतात.

स्मशानभूमीत मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करून एकूण 1,475 उंच वाढणाऱ्या वृक्षांच्या विविध प्रजाती तसेच आतमध्ये 200 वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे परिसर अत्यंत निसर्गरम्य झाला असून वृद्धांसाठी बाकड्यांची व्यवस्था व हात धुण्यासाठी हँड-वॉश स्टेशन बसविण्यात आले आहे. त्यामुळे बाहेरून येणारे अधिकारी व मान्यवर या परिसराला ‘वैकुंठ धाम’ असे संबोधतात.

गाव शहरालगत असल्याने नव्या वस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास होत असून अंतर्गत रस्त्यांवर 5,000 झाडांची लागवड करून परिसर अधिक हिरवागार करण्यात आला आहे. कचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक घराला ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी दोन कचरा कुंड्या पुरविण्यात आल्या आहेत व नियमित कचरा संकलनासाठी घंटागाडीची सोय करण्यात आली आहे.

अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळांची रंगरंगोटी करून त्यांना अधिक आकर्षक व शैक्षणिकदृष्ट्या प्रेरक बनविण्यात आले आहे. चौथी व पाचवीचे वर्ग पूर्णतः डिजिटल करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक बेंचेस, प्रोजेक्टर तसेच स्पोकन इंग्लिश शिकविण्यासाठी तज्ञ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती 100% राहते आणि ते उत्साहाने शिक्षण घेतात.

मौजे सिकंदरपूर हे स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, डिजिटल शिक्षण आणि नागरिकाभिमुख सुविधा यांच्या माध्यमातून सतत प्रगतीपथावर असलेले एक आदर्श गाव म्हणून उदयास येत आहे.

🌿 सिकंदरपूर ग्राम संसद – कार्यकाळ!

❖ सरपंच/उपसरपंच, सदस्यांची यादी 2021-2026

सौ. रेश्मा माधव गंभीरे

सरपंच सिकंदरपूर

श्री. पिराजी इटकर

उपसरपंच सिकंदरपूर

सौ.मंगलबाई जनार्धन ताटे

सदस्य

सौ.बाळूबाई सुरेश इटकर

सदस्य

सौ.रामुबाई सुरेश लष्करे

सदस्य

श्री. उध्दव माधवराव गंभीरे

सदस्य

श्री. शिवाजी किशनराव देशमुख

सदस्य

श्री. गजानन नागनाथ बोयने

सदस्य

सौ.मंजुषा गोपाळ सुरवसे

सदस्य

Scroll to Top