श्रमदानातून बांधलेल्या वनराई बंधाऱ्याचे जलपूजन…

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद लातूर, पंचायत समिती लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट व्हिलेज सिकंदरपुर आय. एस. ओ. वैकुंठधाम येथील लेंडी नाल्यावर एक दिवस गावासाठी या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.

या बंधाऱ्यात जवळपास पाचशे मीटर पाणी थांबले असून थांबलेल्या पाण्याचे जल पूजन जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्याम गोडभरले, उपक्रमशील सरपंच रेशमा गंभीरे, यशदा प्रवीण प्रशिक्षक माधव गंभीरे, उप सरपंच पिराजी इटकर, ग्रामपंचायत अधिकारी के. बी. कलवूने यांनी केले. सिकंदरपूर येथे सर्व जाती धर्मासाठी वन गेट सर्व सोयीनियुक्त आय. एस. ओ. माणांकण प्राप्त वैकुंठ धाम एक एकर मध्ये आहे.

तेथे १६७६ मियावाकी (घनदाट जंगल) वृक्ष लागवड असून इतर सावली साठी तीनशे फळाची झाडे लावली असून त्या सर्व झाडाचे संगोपन करण्यासाठी एक विधन विहीर (बोअर) असून त्याच्या बाजूने एक हंगामी लेंडी नाला असून विंधन विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी म्हणून सरपंच रेशमा माधवराव गंभीरे यांच्या संकल्पनेतून गावातील युवक व ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. सदर श्रमदान उपक्रमात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, यशदा प्रवीण प्रशिक्षक माधव गंभीरे, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष ज्योतीराम कदम, अमित शिंदे, अमित कसबे, सोमनाथ बोयने, राजेखा पठाण, सोपान बोयने, प्र जनजागृती, सातत्यपूर्ण उपक्रमाचे फलीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात वनराई बंधारा, जल तारा प्रकल्प, शासकीय व वैयक्तिक घरावर रेन हार्वेस्टिंग, सार्वजनिक व वैयक्तिक ठिकाणी शोष खड्डे, पाणी अडवणे पाणी जिरवणे वृक्ष लागवड-संगोपन लोकसहभाग, स्वच्छता व जनजागृती यासाठी सातत्यपूर्ण उपक्रम राबविणे हा उद्देश आहे. काश दंडगुले, रोहित कदम, देवानंद अडसूळे, लक्ष्मण चाबुकस्वार, सुरज जाधव, इमाम शेख, सिद्धेश्वर गंभीरे, बालाजी ताटे, वैभव लाळे, प्रशांत गरगट्टे, महेताब शेख, मह-श कदम ग्रामपंचायत कर्मचारी गहिनीनाथ वोयने, भास्कर गरगट्टे, महेश गंभीरे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Scroll to Top