मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट व्हिलेज सिकंदरपूरच्या उपक्रमशील सरपंच प्रा. रेशमा माधवराव गंभीरे यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून प्रभात वेळी स्मार्ट व्हिलेज सिकंदरपूर अंतर्गत येणाऱ्या परिसरामध्ये स्वच्छता ही ग्रामसेवा या संकल्पनेवर आधारित श्रमदान व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत दिपावली उत्सवामध्ये ग्रामस्थ, तरुण, व्यापारी यांनी केलेल्या अतिषबाजीमधून फटाके, तोटे, आदल्या, नळकांड्या, सुतळी बॉम्ब, झाडं, फुलबाज्या, भुय चक्कर सह इतर वाजवलेल्या फटाक्याच्या कचऱ्याचे, अर्धवट दीपावलीत ग्राम स्वछता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत ग्रामसंसदेच्या सार्वजनिक ठिकाणची दीपावलीच्या उत्सवामध्ये फटाके, फोडून जमा झालेला कचऱ्याचे संकलन करून परिसर स्वच्छ करून अर्धवट राहिलेल्या फटाक्याचे, वात खुडलेल्या फटाक्यापासून लहान मुलांना धोका होऊ शकतो ही जनजागृती करण्यासाठी युवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांना सोबत घेऊन ग्राम स्वछता केली. वाजवलेल्या फटाक्याचे श्रमदानातून संकलन करुन नाडेफच्या खत प्रकल्पात कचऱ्याची विल्हेवाट लावली. ग्राम संसद घरातील ओला व सुका कचरा घंटा गाडीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन संकलन करत असते. पण दीपावलीमध्ये वाजवलेल्या स्फोटक कचऱ्याचे संकलन करून गावातील मुख्य रस्ते व उपरस्ते ग्राम संसद भवन परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, हनुमान मंदिर सभागृह परिसर, आण्णा भाऊ साठे चौक, महर्षी वाल्मिकी चौक व संपूर्ण गावातील किराणा दुकाने, पाणी फिल्टर, इतर सर्व प्रतिष्ठाना समोरील फटाक्याच्या कचऱ्याचे संकलन केले सदर उपक्रमात माजी सरपंच तथा सरपंच प्रतिनिधी यशदा प्रवीण प्रशिक्षक माधव गंभीरे, स्वच्छता दूत भारतबाई चाबुकस्वार, अमित शिंदे, अमित कसबे, भारतबाई चाबुकस्वार, उस्मान शेख, नबी शेख, धनाजी हंकारे, व्यंकट गरगट्टे, ग्रामपंचायत कर्मचारी गहिनीनाथ बोयने, भास्कर गरगट्टे, महेश गंभीरे यांनी दीपावली पाडवा असतानाही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.



