जिल्हा परिषद लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आय. ए. एस. राहुलकुमार मिना यांच्या हस्ते

जिल्हा परिषद लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आय. ए. एस. राहुलकुमार मिना यांच्या हस्ते 🏡 स्मार्ट व्हिलेज सिकंदरपूर येथे नावीन्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ

लातूर, दि. 17 सप्टेंबर २०२५ – ता. जि. लातूरमधील स्मार्ट व्हिलेज सिकंदरपूर येथे मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान २०२५ अंतर्गत विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ जिल्हा परिषद लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (IAS) राहुलकुमार मीना यांच्या हस्ते करण्यात आला. हा उपक्रम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा परिषद लातूर व पंचायत समिती लातूरच्या मार्गदर्शनाखाली राबवला येत असून, मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमात उमंग संस्थेच्या सहकार्याने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना सुरुवात झाली.

👏🏻 मुख्य उपक्रम व शुभारंभ:
– अंगणवाडी केंद्रातील बालआरोग्य तपासणी: आय.एस.ओ. (ISO)प्रमाणित अंगणवाडी केंद्रात बालकांच्या आरोग्य तपासणीचा शुभारंभ करण्यात आला. चिमुकल्या मुलींनी तुळशी रोप देऊन स्वागत केले.

– पंचायत लर्निंग सेंटर: ग्रामीण विकास व शिक्षणासाठी पंचायत लर्निंग सेंटरचे उद्घाटन झाले, ज्यात डिजिटल सुविधा उपलब्ध असतील.

– सुकन्या वृक्ष लागवड : मुलींच्या नावाने वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ, ज्यात ‘एक पेड माँ के नाम’ संकल्पनेचा समावेश आहे.

स्वागत व प्रास्ताविक:
– ग्रामसंसद भवनात गावच्या उपक्रमशील सरपंच प्रा. रेशमा माधवराव गंभीरे व ग्रामपंचायत अधिकारी खंडू कलबूने यांनी मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
– प्रास्ताविकात यशदा प्रवीण प्रशिक्षक माधव गंभीरे यांनी सिकंदरपूरमधील जलसंरक्षण, वृक्ष संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, भौतिक व पायाभूत सुविधा तसेच शासनाच्या नऊ थीम्सवर आधारित शाश्वत विकास व विविध योजनांच्या लक्ष्यवेधी उपक्रमांची माहिती दिली.

संस्थात्मक व विकासात्मक योगदान:
– ग्राम संसद भवन व अंगणवाडी इमारत: बौद्ध समाजातील भगिनींच्या रजिस्टर दानपत्रानुसार ३,००० स्केअर फूट जागेत भव्य व आधुनिक इमारत बांधण्यात आली. यात पीयूपी, फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, एसी, कॉफी मशीन, एलईडी स्क्रीन बोर्ड, प्रोजेक्टर, स्क्रीन व डायस यासारख्या सुविधा स्वनिधी निधीतून उपलब्ध केल्या आहेत.

– वनराई बंधारा: वैकुंठधाम येथील लेंडी नाल्यावर ‘ एक दिवस गावासाठी ‘ संकल्पनेतून लोकवर्गणी व श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.

पर्यावरणीय उपक्रम:
मियावाकी जंगल व वृक्षारोपण: वैकुंठधाम ( १ एकर ) येथे सर्व जाती-धर्मांसाठी आय.एस.ओ. प्रमाणित वनगेट व सुविधा उपलब्ध. येथे १,६७६ मियावाकी (घनदाट जंगल ) वृक्ष लागवड तसेच सावलीसाठी ३०० झाडे लावली आहेत. महिला व पुरुषासाठी स्वतंत्र सुलभ शौच्छालय,नाडेफ प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, तेसेच पशु पक्षाला पाणी पिण्यासाठी पांणकुंड्या व पाणवठे तयार केलेल्या माहिती सह सुकन्या वृक्ष लागवड मोहिमेची सविस्तर माहिती देण्यात आली.

उपस्थित मान्यवर:
या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी ( महिला व बालकल्याण ) जावेद शेख, जि. प. चे समजकल्याण अधिकारी नाईकवाडे, लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्याम गोडभरले, पंचायत समितीचे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी साईनाथ वंगारी उपस्थित होते.
वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी प्रदीप बोंबले अंगणवाडी पर्यवेशिका सिमा शिंदे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उमंग संस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी तथा ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास महिला पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा उपक्रम सिकंदरपूरला स्मार्ट व शाश्वत गाव म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

==========================

Scroll to Top