“गावाच्या विकासासाठी दिल्लीच्या पायऱ्या—रेशमा गंभीरेंचा नेतृत्वाचा नवा अध्याय!”

नवी दिल्ली येथे देशाचे पंचायतीराज मंत्री, राज्य मंत्री, मुख्य सचिव यांना सरपंच रेशमा गंभीरे यांनी महाराष्ट्रील सरपंचाच्या विविध समश्याचे दिले निवेदन
दिल्ली –

डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे देशाचे पंचायतीराज तथा दुग्धपालन, मस्य पालन मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लनसिंह तसेच राज्य मंत्री एस. पी. एस. बघेल पंचायती राज विभागाचे मुख्य सेक्रेटरी विवेक भारद्वाज यांना सिकंदरपूरच्या विविध पुरस्कार प्राप्त, उपक्रमशील सरपंच रेशमा माधव गंभीरे ता.जि. लातूर यांनी महाराष्ट्र राज्यातील सरपंच -उपसरपंच यांच्या वाढीव मानधन, वित्त आयोग कृती आराखडा सरपंच स्व निधी, जलजी वन जल मिशन सह सरपंचाना येणाऱ्या अडचणी बाबत निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.

मंत्री महोदयांनी सरपंच गंभीरे यांचे प्रश्न समजून सकारात्मक प्रतिसाद दिला. तत्पूर्वी पंचायती राज संस्थे मधील निवडून आलेल्या महिला सरपंचाच्या एक दिवसीय कार्यशाळेत पंचायत राज संस्थेतील महिला धोरण, महिला प्रतिनिधी यांना येणाऱ्या अडचणी महिला ससशक्ती करण, महिला सरपंचाचा सहभाग, नऊ ध्येय, सतरा उदिष्ठ, वित्त आयोग, दुग्ध व्यवसाय, मत्स व्यवसाय, पशुपालन या विषयावर माजी आय. पी.एस. अधिकारी किरण बेदी, जॉईट सेक्रेटरी ममता वर्मा, मुख्य सेक्रेटरी विवेक भारद्व-राज, राज्य मंत्री एस. पी. एस.एस बघेल तसेच देशाचे पंचायती राज, दुग्ध पालन, मत्सपालन मंत्री लल्लन सिंह यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

  • “महाराष्ट्राच्या सरपंचांचा हक्क, दिल्लीच्या दारात बुलंद आवाज!”

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सिकंदरपूर येथे केंद्र शासन व राज्य शासन मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेची व शाश्वत विकासच्या स्वच्छ व हरीत गावच्या संकल्पनेची चित्रफीत दाखवली. या कार्यक्रमास प्राथमिक स्वरूपात देशातून ४०० महिला सरपंच तर महाराष्ट्र राज्यातून १४ उप्रमशील निवडक महिला सरपंचांना निमंत्रित करण्यात आले होते.

Scroll to Top