🏡 स्मार्ट व्हिलेज ग्रामसंसद सिकंदरपूर, लातूर

स्थान  : लातूर शहराच्या दक्षिण बाजूस, लातूरपासून 3 कि.मी. अंतरावर
मतदारसंघ  : लातूर शहर मतदारसंघ
लोकसंख्या (2011)   : 1,554
कुटुंब संख्या  : 315
साक्षरता दर : 90%
पाण्याचे स्रोत :
विहीर 2 , बोरवेल 4, 
प्रशासकीय सुविधा  : भव्य ग्रामसंसद भवन व आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत
सेवा केंद्राच्या सुविधा  : सर्व शासकीय ऑनलाइन सेवा व दाखले उपलब्ध
महत्त्वाची देवस्थाने : अनुसया माता मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल–रुक्मिणी मंदिर, श्रीकृष्ण खाटू श्याम मंदिर, एकलिंगेश्वर मंदिर, नृसिंह मंदिर
स्मशानभूमी विकास  : मियावाकी पद्धतीने 1,475 वृक्ष लागवड; आतमध्ये 200 वृक्ष अतिरिक्त; वृद्धांसाठी बाकडे व हात धुण्याची सुविधा
विशेष ओळख  : स्मशानभूमीला ‘वैकुंठ धाम’ म्हणून मान्यता
नवीन वस्त्यांचा विकास  : अंतर्गत रस्त्यांवर 5,000 झाडांची लागवड
कचरा व्यवस्थापन  : प्रत्येक घराला दोन कचरा कुंड्या – ओला/सुका कचरा; घंटागाडीची सोय
अंगणवाडी व शाळा विकास  : रंगरंगोटी करून शैक्षणिक वातावरण अधिक आकर्षक केले
डिजिटल शिक्षण  : 4थी–5वी वर्ग डिजिटल; प्रोजेक्टर, आधुनिक बेंचेस, स्पोकन इंग्लिशसाठी तज्ञ शिक्षक
विद्यार्थी उपस्थिती  : 100% उपस्थिती, उत्साहपूर्ण शैक्षणिक सहभाग
ग्रामविकासाची वैशिष्ट्ये  : स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, डिजिटल शिक्षण, नागरिकाभिमुख सेवा

(अधिक माहिती आमच्याद्दल …)

सौ. रेश्मा माधव गंभीरे

सरपंच

श्री. पिराजी इटकर

उपसरपंच

श्री. के. बी. कलबुने

ग्रामपंचायत अधिकारी

प्रशासकीय संरचना

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे

माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. योगेश कदम

माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. एकनाथ डवले

प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्रीमती. वर्षा ठाकूर – घुगे (भा.प्र.से)

जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी.लातूर

श्री. राहुल कुमार मीना (भा.प्र.से)

मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद लातूर

🌿 सिकंदरपूर : परिवर्तनाची प्रेरणादायी (कहाणी)– यशोगाथा!​

कोरोना काळात 100% लसीकरण, दारूबंदी, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, डिजिटल शिक्षण, घरकुल योजना आणि ५ कोटींची विकासकामे करून राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवलेले आदर्श गाव. (अधिक माहितीसाठी  …)✨

🏅 ग्रामपंचायत सिकंदरपूरला मिळालेले पुरस्कार 🏅

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे महाराष्ट्र राज्य शासनाने ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेले एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवणे, सुशासनाला चालना देणे तसेच कामगिरीच्या आधारे प्रोत्साहन व पुरस्कार देऊन विकास प्रक्रियेला गती देणे हा आहे.

या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींचे मूल्यमापन सुशासन, सक्षम पंचायत, जलसमृद्धी, हरित व स्वच्छता इत्यादी सात प्रमुख घटकांवर आधारित केले जाते. या घटकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य शासनामार्फत सन्मानित व पुरस्कृत करण्यात येते.

सिकंदरपूर ग्रामपंचायत, लातूर येथे या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, ग्रामस्तरावर नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

ग्रामस्तरीय समितीविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा. 👇

Scroll to Top